बिग बॉस १५ मध्ये जेव्हा राखी सावंतनं वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. कारण यावेळी तिनं सर्वांशी तिच्या पतीची ओळख करून दिली. अनेक दिवस राखीच्या लग्नाची चर्चा झाल्यानंतर अखेर बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये राखी सावंतचा पती रितेश पहिल्यांदा सर्वांसमोर आला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रितेशनं पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतलं. ज्यावरू त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र यावेळी बिग बॉस १५ चा सदस्य करण कुंद्रानं रितेशची बाजू घेत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

रितेशनं इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतल्यानंतर एका युजरनं त्याच्या इन्स्टाग्राम सेशनचा स्क्रिनशॉट शेअर करत रितेशला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या युजरनं लिहिलं, ‘इतिहास रचला. बिग बॉस सदस्य रितेशचे इन्स्टाग्राम लाइव्हवर १११ युजर्स. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.’ ट्विटरवरील ही पोस्ट पाहिल्यानंतर राखीचा मित्र आणि बिग बॉस १५ चा सदस्य करण कुंद्रान या युजरला चांगलंच सुनावलं आहे.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

करणनं या युजरच्या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिलं, ‘मला माहीत आहे तुम्ही हे असं त्यांची खिल्ली उडवण्यासाठी असं लिहिलं आहे. पण असं करणं चुकीचं आहे. मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला आहे. ते सुद्धा आपल्या सारखेच आहेत. त्यांना देखील भावना आहेत. एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पाहा  आणि मग सांगा तुम्हाला कसं वाटतं.’

दरम्यान बिग बॉसच्या घरात असताना करण कुंद्रा कुणाच्याही बाजूने बोलत नाही म्हणून त्याला नेहमीच बोललं जायचं. यावरून स्वतः सलमान खाननंही त्याला एकदा ‘विकेंड का वार’मध्ये बरंच सुनावलं होतं. एवढंच नाही तर ‘जनता का सवाल’च्या वेळी त्याला तेजस्वी प्रकाशची बाजू न घेतल्यानं बरेच प्रश्न विचारण्यात आले होते.

Story img Loader