बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राजीव अदातियाची एंट्री झाली आहे. वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यानं बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. राजीवला पाहून घरातील सदस्य खूश होतात पण तो सर्वांना सूचना देतो की, सर्वांनी सावध राहा कारण येणार काळ सर्वांसाठी जास्त कठीण असणार आहे. अशात बिग बॉस घरातील सदस्यांना त्याच्या कुटुंबीयांशी बोलण्याची संधी देतात. यावेळी करण कुंद्राचे आई-बाबा त्याच्याशी बोलताना दिसले आणि त्यांनी यावेळी करण-तेजस्वीच्या नात्यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस १५ च्या सदस्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सर्वात आधी निशांत भट्ट त्यांच्या आई-वडिलांशी बोलताना दिसतो. त्यानंतर रश्मि देसाई तिच्या आईशी बोलते. त्यानंतर, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, राखी सावंत आपापल्या कुटुंबीयांशी बोलतात आणि मग करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांशी बोलताना दिसतो.

प्रोमोमध्ये व्हिडीओ कॉलवर बोलताना करण तेजस्वीच्या नात्यावर करणचे आई-वडील प्रतिक्रिया देताना दिसतात. करण जेव्हा त्याच्या आई-बाबांना तेजस्वीबद्दल विचारतो. तेव्हा ते, तेजस्वी आता आपल्या कुटुंबातली खास सदस्य बनली आहे असं सांगतात. ते म्हणातात, ‘ती आता आपल्या कुटुंबाचं हृदय आहे.’ करणच्या बाबांचं बोलणं ऐकल्यावर घरातील सर्व सदस्य देखील खूश झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर करण तेजस्वीला सांगतो की, तुला आनंद झाला पाहिजे कारण माझ्या बाबांनी आतापर्यंत असं कोणत्याच मुलीबद्दल बोललेलं नाही.

याच प्रोममध्ये पुढे दाखवण्यात आलंय की, तेजस्वी तिच्या भावासोबत बोलताना खूप इमोशनल होते. त्याची मस्करी करते, त्याच्याशी बोलते आणि नंतर त्याला करणबद्दल विचारते. त्यावर तेजस्वीचा भाऊ सांगतो की, ‘करणसाठी आईनेही होकार दिला आहे.’ त्यानंतर तो करणसोबतही बोलताना दिसतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan kundrra father reacts on his son relationship with tejasswi prakash mrj