श्रुती कदम

नवदीच्या दशकातील हिंदी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘दिल मिल गए’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने सात वर्षांच्या काळानंतर पुन्हा हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याबरोबर लग्न आणि त्यानंतर मुलगी देवीचा जन्म, तिच्या आजारपणामुळे तो कामापासून लांब राहिला होता. आता करणने ‘फायटर’ चित्रपटाद्वारे दमदार भूमिकेतून पदार्पण केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ या चित्रपटात करणने साकारलेल्या स्क्वॉड्रन लीडर सरताज गिल या भूमिकेचं कौतुक होतं आहे.  या चित्रपटाबद्दल आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल करणने ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या चित्रपटात करणने साकारलेल्या स्क्वॉड्रन लीडर सरताज गिलच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत. पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने कशाप्रकारे हवाई हल्ला करून त्यांना ठार केले या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. एकतर हा भारतातील पहिला हवाई अ‍ॅक्शनदृश्ये असलेला चित्रपट आहे.  या चित्रपटातील हवाई हल्ल्याची दृश्ये वास्तवात चित्रित करण्यात आली आहे. यापूर्वी आकाशातील अशा अ‍ॅक्शन दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर मोठया प्रमाणावर होता. त्यामुळे या चित्रपटाची पूर्वतयारीही तितकीच कलाकारांसाठी कठीण होती, शिवाय या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूरसारख्या कसलेल्या कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं होतं. त्यामुळे इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा ‘फायटर’च्या चित्रीकरणाचा अनुभव वेगळा होता, असं करणने सांगितलं.

हेही वाचा >>>आमिर खानच्या चित्रपटात झळकणार देशमुखांची सून! जिनिलीया पोस्ट शेअर करत म्हणाली, “१६ वर्षांनी…”

मुळात या चित्रपटासाठी कशाप्रकारे निवड झाली याबद्दलची आठवण त्याने सांगितली. ‘मला २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘फायटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या पत्नीचा ममता आनंद यांचा फोन आला होता. त्या मला म्हणाल्या, आम्ही एक चित्रपट करतोय आणि या चित्रपटाचा तू एक भाग असावं अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या एवढय़ा म्हणण्यावर मी लगेच त्यांना माझा होकार कळवला. मला कोणतं पात्र साकारायचं आहे? काय चित्रपट आहे? काय गोष्ट आहे? असं काहीच त्यांना त्यावेळी विचारावंसं नाही वाटलं. मी फक्त त्यांना सांगून ठेवलं होतं, आपण चित्रीकरण कधी सुरू करतोय ती तारीख वेळ मला सांगून ठेवा, मी त्यावेळी सेटवर येईन. अशाप्रकारे मी या चित्रपटाचा भाग झालो’ असं करणने सांगितलं.

स्क्वॉड्रन लीडर सरताज गिल ही भूमिका साकारताना काय शिकायला मिळालं? याबद्दल सांगताना करण म्हणाला, स्क्वॉड्रन लीडर सरताज गिल हे पात्र या चित्रपटात साकारण्यासाठी मला स्वत:वर खूप काम करावं लागलं. माझ्या ट्रेिनगमध्ये बराच बदल करावा लागला होता. सरताजचं पात्र साकारण्यासाठी मला शारीरिक मेहनती बरोबरच माझ्या स्वभावातदेखील बराच बदल करावा लागला. सरताज हा जे दिसतंय ते सत्य आहे हे मानणारा आहे. कठोर मेहनत करणारा असला तरी आपलं आयुष्य मनमुराद जगणारा, पत्नीवर मनापासून प्रेम करणारा असा आहे. त्याचं देशाबद्दलचं प्रेमही असंच कडवं आहे. तो देशासाठी काहीही करायला तयार आहे. आपल्या जीवाचीही पर्वा न करता तो संकटाचा सामना करतो. त्यामुळे देशनिष्ठा, प्रेमळ माणूस अशा कित्येक त्याच्या व्यक्तित्वातील छोटय़ा छोटय़ा गोष्टी आत्मसात करून त्या मला पडद्यावर रंगवता आल्या, याचा आनंद वाटतो.

हेही वाचा >>>तब्बल ६४ वर्षांनी धर्मेंद्र यांनी आपल्या नावात केला मोठा बदल, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

‘फायटर’च्या निमित्ताने पहिल्यांदाच त्याने दीपिका, ह्रतिक आणि अनिल कपूर यांच्याबरोबर काम केलं आहे. हा खूप सुंदर अनुभव होता. आम्ही सेटवर खूप मज्जा केली. हे तिघंही मज्जा मस्ती करत काम करणारे कलाकार आहेत. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली मोठी गोष्ट म्हणजे कितीही दंगा मस्ती सुरू असली तरी सेटवर शिस्त असलीच पाहिजे. त्यांची ही गोष्ट मला खूप आवडली, असं करणने सांगितलं. 

‘दिल मिल गए’ या मालिकेतील अरमान मलिकपासून ते ‘फायटर’च्या सरताज गिलपर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल बोलताना करण म्हणतो, ‘मला आतापर्यंत जेवढी पात्रं साकारायला मिळाली, त्या प्रत्येक पात्राकडून मी खूप काही शिकत गेलो. अरमानपासून ते सरताजपर्यंत माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखेने मला एक तरी चांगली नवीन सवय लावली, तसंच माझ्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांनी आणि माझ्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. एका कलाकारासाठी यापेक्षा सुखद अनुभव कोणता असू शकतो’.

मुलीपासून लांब राहून काम करणं कठीण..

‘फायटर’च्या चित्रीकरणाचा अनुभव करणसाठी थोडासा वेदनादायीही होता. मुलीचं देवीचं आजारपण याच काळात बळावलं होतं. त्यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला खूप आधार दिला, असं करण सांगतो.‘ माझ्या मुलीच्या आजाराचं निदान त्यावेळी झालं होतं. अशा वेळी तिच्यापासून लांब राहून काम करणं फार कठीण जात होतं. तिच्यावरच्या उपचारांची दिशाही त्याच वेळी ठरवली जात होती. त्यावेळी मला माझ्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी सांभाळून घेतलं. वैयक्तिक जीवनात सुरू असलेला संघर्ष व्यावसायिक जीवनापासून लांब ठेवत मनापासून भूमिका करण्याचा प्रयत्न मी त्यावेळी केला, असं करणने सांगितलं.

हिंदी मालिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पोहोचणं, तिथे काम मिळवणं थोडं कठीण असतंच. पण कलाकार हा शेवटी कलाकार असतो. मला कधी भेदभाव झाल्याचा अनुभव नाही आला. तुम्ही या क्षेत्रात तुमच्या कामामुळेच टिकून राहू शकता. तुमचं काम कसं आहे यावर तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळते. त्यामुळे हिंदी मालिकांमधून काम करून मग मी हिंदी चित्रपटसृष्टीत आलो आहे या कारणाने कधी माझ्याबरोबर भेदभाव नाही झाला.-करण सिंग ग्रोव्हर