मालिकांमधील मुख्य कलाकारांनी मधूनच मालिका सोडणे हे काही आता नवीन नाही. पण, ‘कबूल है’ या झी वाहिनीवरील मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या करण सिंग ग्रोवरला निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
३१ वर्षीय करण सिंग ग्रोवर हा संबंधित मालिकेविषयी असलेली बांधिलकी पूर्णपणे निभवत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘दिल मिल गये’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या करणवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अव्यावसायिक वर्तन करणारा व्यक्ती हा कठोर कारवाईस पात्र असतो. कलाकारांच्या अनियमित आणि अव्यावसायिक वर्तनाचा इतरांच्याही उपजीविकेवर परिणाम होतो. आम्ही करणवर कायदेशीर कारवाई करणार असून, त्याच्याजागी लवकरच दुस-या कलाकाराची निवड करण्यात येईल, असे झी कन्टेन्ट प्रमुख अजय भालवनकर म्हणाले.

Story img Loader