प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वी ग्रोवरनं ३१ मे ला गर्लफ्रेंड पॉपी जब्बलशी हिमाचल प्रदेशात लग्न केलं होतं. एका खासगी विवाह सोहळ्यात दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नासाठी केवळ दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नानंतर करण आणि पॉपी यांनी लग्नाची पार्टी दिली. ज्यात टीव्ही जगतातील बरेच स्टार कलाकार सहभागी झाले होते. पण या रिसेप्शनमध्ये करणचं असं रुपही पाहायला मिळालं ज्यामुळे त्याचे चाहतेही हैराण झालं. स्वतःच्याच रिसेप्शन पार्टीमध्ये करण वी ग्रोवर फरशीवर पडलेला कचरा साफ करताना दिसला.
करण वी ग्रोवरच्या वेडिंग रिसेप्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये पार्टीसाठी आलेले पाहुणे एन्जॉय करताना दिसत आहेत. तर नवविवाहित दांपत्य करण वी ग्रोवर आणि पॉपी जब्बल देखील धम्माल करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर करण ग्रोवर मॉपिंग स्टिक हातात घेऊन साफ- सफाई करताना दिसत आहे आणि त्याला असं करताना पाहून तिथे उपस्थित असलेले पाहुणे हसताना दिसत आहेत. करणचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा- 21 Years of Lagaan : शूटिंगच्या वेळी सलग ६ महिने सुरू होता गायत्री मंत्र, अन् आमिर खानने अचानक…
दरम्यान करण आणि पॉपी यांच्या लग्नाचा रिसेप्शन पार्टीमध्ये रिद्धिमा पंडित, विवेक दहिया, दिव्यांका त्रिपाठी दहिया, वाहबिज दोराबज, शमा सिकंदर, छवि मित्तल आणि सौम्या टंडन यांच्यासह इतर अनेक स्टार कलाकार सहभागी झाले होते. रिसेप्शनसाठी करणने सूट परिधान केला होता. तर पॉपी सिंपल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या दोघांच्या रिसेप्शन डान्सची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे.