दिवंगत अनंत विष्णू ऊर्फ बाबूराव गोखले यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेले ‘करायला गेलो एक’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी मंदिर येथे नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
बाबूराव गोखले, राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांनी गाजविलेले हे नाटक आता नव्याने अभिनेते विजय गोखले यांनी दिग्दर्शित केले आहे. किशोर सावंत व विवेक नाईक यांनी याची निर्मिती केली आहे.
नाटकात विजय गोखले यांच्यासह नियती राजवाडे, अतुल तोडणकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशी वेळ आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी येते. अशाच गमतीदार प्रसंगावर हे नाटक आधारित आहे.
आणखी वाचा