करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटानंतर करिना आणि हृतिक ‘शुद्धी’ चित्रपटात एकत्रित काम करताना दिसणार आहेत. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार असून हृतिकने यापूर्वी ‘अग्निपथ’ चित्रपटामध्ये मल्होत्रासोबत काम केले होते.
करण म्हणाला की, १२ वर्षांनंतर मी हृतिक आणि करिनासोबत एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. जेव्हा करण मल्होत्रा या चित्रपटाची कल्पना माझ्याकडे घेऊन आला त्यावेळेस त्याने या दोघांचे नाव मला सुचविले. त्यानंतर मी या दोघांशी चर्चा केल्यावर त्यांनी चित्रपटात एकत्रित काम करण्यासही होकार दिला.
मल्होत्रा, कपूर आणि रोशन यांची तिगडी या प्रेमकथेला नक्कीच यशस्वी करतील, असा करणला विश्वास आहे. ‘शुद्धी’चे चित्रिकरण सुरु झाले असून पुढील वर्षी ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader