करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर अली खान जन्माआधीपासूनच चर्चेचा विषय ठरला. आपल्या आई-वडिलांपेक्षाही मोठा सेलिब्रिटी बनणारा तैमुर जिथेही जातो तिथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. तैमुर मोठा होऊन सर्वांसाठी स्टाईल आयकॉन बनेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आतापर्यंत करिना आणि तैमुर या माय लेकांच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र आता मामा रणबीर कपूरसोबत तैमुरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दोघांचा हा फोटो जरी फोटोशॉप केलेला असला तरी मामा-भाचाची ही जोडी अतिशय सुंदर दिसतेय. यामध्ये रणबीरच्या मांडीवर बसलेला तैमुर खूपच गोंडस दिसतोय. रणबीर आणि तैमुरचा एकत्र फोटो अद्याप चाहत्यांना पाहायला मिळाला नसला तरी हा फोटोशॉप केलेला फोटो मात्र सर्वांचंच लक्ष वेधतोय. सध्या रणबीर त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशन आणि संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे भाचा तैमुरला भेटण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळत नाही आहे.

https://www.instagram.com/p/BVaGU_jjgql/

वाचा : दलेर मेहंदी आणि राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करणारा शार्पशूटर गजाआड

तैमुरला तीन महिन्यांचा असताना पाहिलं होतं असं रणबीरने नुकतंच एका रेडिओ स्टेशनवर मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. ‘त्यानंतर आता मी जेव्हा इंटरनेटवर त्याचे नवीन फोटो बघितले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर ‘सुंदर…. कोण आहे हा?’ असे भाव होते. सैफ आणि करिनाची झलक त्याच्यात पूर्णपणे दिसून येते. तो चित्रपटसृष्टीत कधी पदार्पण करतोय याकडेच आम्हा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे,’ असेदेखील रणबीरने म्हटले होते. करिना आणि सैफचा हा छोटा नवाब आता पाच महिन्यांचा झाला असून, त्याचे फोटो टिपण्यासाठी नेहमीच फोटोग्राफर्स खूप उत्सुक असतात.

Story img Loader