बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. करीना आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. करीनाने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, तिला खरी प्रसिद्धी ही ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातीन ‘पू’ ही करीनाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते, तेव्हा करण जोहर आणि करीना व्यतिरिक्त कोणालाही हे पात्र आवडले नव्हते.
या विषयी करीनाने अनुपमा चोप्राला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. खरं तर, करणने एकदा सांगितले होते की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी करीना आणि त्याच्याशिवाय कोणालाही ‘पू’ आवडली नाही. अनुपमा चोप्राने करीनाला याबद्दल विचारले होते. “जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते, तेव्हा सगळ्या कलाकारांनी सांगितले की हे पात्र चित्रपटात फक्त मनोरंजनासाठी ठेवण्यात आले आहे. मला असा प्रतिसाद मिळत होता. पण जेव्हा लोकांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी मला सांगितले, अरे, आम्ही यापूर्वी असे काहीही पाहिले नाही. पू अप्रतिम आहे,” असे करीना म्हणाली होती.
पुढे करीना म्हणाली, “माझी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. सुरुवातीला लोकांनी माझ्या भूमिकेचा तिरस्कार केला पण नंतर प्रत्येकव्यक्ती बोलू लागली की आम्हाला ‘पू’सारखे व्हायचे आहे. या सगळ्याचे श्रेय हे करण जोहरला जाते. तो सतत मला सांगायचा की लोकांना ही भूमिका प्रचंड आवडेल. पण मी घाबरलेली होती.”
पुढे करीना म्हणाली, “अजुनही लोक ‘पू’ या पात्राला विसरले नाही आहे. जेव्हा पण ती लंडनला जाते तेव्हा लोक तिला ‘पू’ म्हणून हाक मारतात.”
आणखी वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली…
दरम्यान, लवकरच करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात करीना आमिरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी करीना ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात दिसली होती.