मागच्या दोन वर्षांपासून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या करोनाचा धोका अद्याप कायम आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना याची लागण झाली होती तसेच काहींना या व्हायरसमुळे जीवही गमवावा लागला. त्यात आता बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरला करोनाची लागण झाली. त्यानंतर करीना आयसोलेशनमध्ये आहे. याच कारणामुळे सैफ देखील तिला भेटू शकत नाही आहे. त्यात सैफने एक शक्कल लढवली असून करीनाने त्याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीना ज्या बिल्डिंगमध्ये सध्या आयसोलेशनमध्ये आहे, त्याच्या समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीत सैफ असल्याचे दिसत आहे. सैफने लाल रंगाच टी-शर्ट आणि शॉट्स परिधान केली आहे. तर तो कॉफी पित असल्याचे दिसत असून त्याच्यासोबत इतर काही लोक आहेत. हा फोटो शेअर करत “ठीक आहे, आम्ही अजूनही…करोनाच्या काळात प्रेमात आहोत. मित्रांनो, विसरू नका!!!”, असे कॅप्शन करीनाने दिले आहे.
आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट
आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव
करीना करोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर ती राहत असलेल्या बिल्डिंगला सील करण्यात आले आहे. त्यासोबत इथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची आरटीपिसीआर टेस्ट केली जात आहे. दरम्यान, करीना आणि अमृता अरोराने बऱ्याच पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.