बॉलिवूडची बेबो आणि सैफ अली खानची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी बऱ्याच वेळा एकत्र काम केले आहे. २००३ मध्ये त्या दोघांनी पेप्सीच्या एका जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीत त्यांच्यासोबत प्रीति झिंटा आणि फरदीन खान देखील होते.
जाहिरातीच्या पहिल्या भागात करीना आणि प्रीति पेप्सीच्या बॉटल त्यांचे शेजारी सैफ आणि फरदीनच्या फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी त्यांच्या घरी जातात. फ्रीजमध्ये त्या बॉटल ठेवण्यासाठी सैफ आणि फरदीन तयारही होतात. संध्याकाळी त्या दोघी त्या बॉटल घेण्यासाठी येतात तर पाहतात की पेप्सीच्या बॉटल खाली आहेत. तर सैफ आणि फरदीन म्हणतात की त्या बॉटल लीक झाल्या आणि त्यांचं फ्रीज त्यामुळे खराब झालं. करीना आणि प्रीती दोघी तिथून रागात निघून जातात आणि प्रीति त्या दोघांना चोर बोलते. तर सैफ आणि फरदीन हसतात.
आणखी वाचा : #BoycottToofaan : प्रदर्शनापूर्वीच ‘तूफान’ वादात; जाणून घ्या काय आहे कारण?
दरम्यान, जाहिरातीच्या दुसऱ्या भागात करीना आणि प्रीति त्यांच्या घरची लाइट गेली आणि त्यांना अंधाराची भीती वाटते म्हणून सैफ आणि फरदीनच्या घरी जातात. त्यानंतर करीना म्हणाली, आमच्या फ्रीजमध्ये खूप पेप्सी आहे आणि प्रीति त्या दोघांना लगेच घराची चावी देते. सैफ आणि फरदीन त्यांच्या घरी पोहोचल्यावर पाहतात की तिथे फक्त खाली बॉटल आहेत. तेवढ्यात करीना आणि प्रीति येतात आणि सैफ-फरदीनला त्यांच्या घरात बंद करतात. त्या दोघीनंतर दोन पेप्सीच्या बॉटल घेऊन मस्ती करताना दिसतात.
करीना आणि सैफने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. २०१२ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. तैमूर त्यांचा मोठा मुलगा आहे तर जेह हे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव आहे. याची माहिती स्वत: रणधीर कपूर यांनी दिली आहे.