बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि ‘सत्याग्रह’ चित्रपटातील तीचा सहअभिनेता अजय देवगणला या चित्रपटाच्या दुबईतील प्रसिध्दी दौऱ्यादरम्यान चाहत्यांनी घेराव घातला.
दुबईत बॉलिवूड तारे-तारकांचा मोठा चाहता वर्ग आहे. करिना कपूर दुबईमधील एका सुवर्णालंकार दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेली असता करिनाची एक झलक पाहण्यासाठी तिच्या शेकडो चाहत्यांनी तेथे गर्दी केली होती.
या ठिकाणी काहीकाळ वाहतूक खोळंबली आणि चेगराचेंगरी सदृष्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती. करिना व अजयला छायाचित्रकारांच्या मदतीने दुकानामध्ये उभे राहण्यासाठी कशीबशी थोडी जागा मिळाली. एका पोलिसाच्या मदतीने ही स्टार मंडळी येथून बाहेर पडली आणि आपल्या कारपर्यंत पोहचली.

Story img Loader