बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना आणि तिची पार्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावेळी करीनाने तिच्या मित्र-मैत्रिणींना एक पार्टी दिली. करीनाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
करीनाच्या या पार्टीमध्ये बहिण करिश्मा कपूर, अमृता अरोरा, संजय मिश्रा, फॅशन डिझायनर मनीश मल्होत्रा आणि दिग्दर्शक करण जोहरने हजेरी लावली होती. त्याचे फोटो मनिष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. करिश्मा आणि करीनाने ही त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करिश्माने पार्टीत असलेली स्पेशल डिश दाल गोश्त आणि कडक पावचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आणखी वाचा : KBC 13 : १५ व्या प्रश्नाचे उत्तर देत सविता ठरणार शोच्या दुसऱ्या करोडपती?
आणखी वाचा : समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी
आणखी वाचा : ‘फॅमिली मॅन २’मध्ये समांथाची भूमिका पाहून शाहिदने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.