बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या मैत्रिणीसाठी आयटम साँग न करण्याचा निर्धार तोडला आहे. यापूर्वी ,दबंग-२ या चित्रपटात ‘फेव्हिकॉल से’ या आयटम साँगवर करिनाची पावले थिरकली होती. त्यानंतर आपण यापुढे आयटम साँग करणार नसल्याचे करिना कपूरने स्पष्ट केले होते. मात्र, करिनाची मैत्रीण शबिना खानच्या ‘गब्बर’ या चित्रपटात ‘बेबो’ प्रेक्षकांना पुन्हा एकदा आयटम साँग करताना पाहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना, आपण शबिनाला नाही म्हणूच शकत नसल्याचे करिनाने सांगितले. शबिना खान ही ‘गब्बर’ चित्रपटाची सहनिर्माती असून तिच्या विनंतीखातर करीना आयटम साँग करण्यास तयार झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साली आयटम साँगसाठी करिनाचा लूक ठरवणार असल्याने करिना खूपच उत्साहात आहे. ‘राम-लीला’ चित्रपटातील ‘राम चाहे लीला चाहे’ या आयटम साँगसाठी संजय लीला भन्सालींनी प्रियांका चोप्राला ज्याप्रकारचा लूक दिला होता, त्यामुळे करिना कपूर खूपच प्रभावित झाल्याची माहिती तिच्या एका मित्राने दिली आहे. तसेच ‘गब्बर’ चित्रपटासाठी आयटम साँग केल्यामुळे संजय लीला भन्सालींच्या आगामी ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात आपली वर्णी लागू शकते अशी करिनाला आशा आहे.

Story img Loader