प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारख्या प्रमुख अभिनेत्रींबरोबर काम करायला मिळाल्यामुळे चित्रपट क्षेत्रात येऊन केवळ दोनच वर्ष होत असलेला आणि फक्त दोनच चित्रपट नावावर असलेला अर्जुन कपूर खुष असून, स्वतःला भाग्यशाली मानत आहे.
मागील वर्षी ‘इशकजादे’ चित्रपटाद्वारे अर्जुन कपूरने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात परिणीती चोप्रा त्याची सहअभिनेत्री होती. तेलगु चित्रपट ओकाडूचा रिमके ‘गुंडे’, ‘फीडिंग फनी फर्नांडीस’ आणि ‘दो स्टेटस’ या आगामी चित्रपटांमध्ये तो प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा आणि आलीय भट या अभिनेत्रींबरोबर दिसणार आहे.
अर्जुन म्हणाला, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रियांका, दीपिका, सोनाक्षी, परिणीती आणि आलीयासारख्या प्रमुख अभिनेत्रीबरोबर काम करत असल्यामुळे मी सर्व तरुण कलाकारांमध्ये स्वतःला भाग्यशाली समजतो. परंतु, अर्जुन एवढ्यावरच संतुष्ट नाहीये, त्याला करीना कपूरसह हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व अभिनेत्रींबरोबर काम कण्याची इच्छा आहे. मला अनुष्का शर्मा, कतरिना कैफ आणि करीना कपूर यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे, परंतु माझे हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे मला माहीत नाही.

Story img Loader