बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये असलेलं भांडण काही बी-टाऊनपासून लपून राहिलेलं नाही. दोन कलाकारांमध्ये काही ना काहीतरी बिनसलं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असे अनेक किस्से तुम्ही देखील ऐकले असतील. असंच काहीसं करीना कपूर खान व बिपाशा बासू यांच्यामध्ये घडलं होतं. ‘अजनबी’ चित्रपटामध्ये करीना-बिपाशाने एकत्र काम केलं. पण याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली.

२००१मध्ये ‘अजनबी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये करीना-बिपाशासह अक्षय कुमार, बॉबी देओल मुख्य भूमिकेमध्ये होते. ‘अजनबी’मध्ये बिपाशाचे काही बोल्ड सीन्स होते. चित्रपटामधील तिच्या भूमिकेची तसेच हॉट लूकची बरीच चर्चा रंगली. तिच्या तुलनेमध्ये करीनाच्या भूमिकेबाबत फारसं बोललं गेलं नाही. हेच करीनाला खटकलं असल्याचं बोललं जातं.

Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
The forest department caught leopard by offering goat after it rejected chicken
बिबट्याने कोंबडी नाकारली पण, बकरी स्वीकारली…

बिपाशाची वाढती लोकप्रियता पाहून करीनाला असुरक्षित वाटू लागलं. त्यानंतर ती बिपाशाचा राग करू लागली. या चित्रपटाच्या सेटवर दोघींचं जोरदार भांडण झालं. दरम्यान बिपाशाला तिने ‘काळी मांजर’ असं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर करीनाने तिच्या कानाखाली मारली होती. या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी बॉबी देओलमध्ये गेला.

आणखी वाचा – बिग बींचा आवाज ऐकल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना आली होती शुद्ध? अमिताभ म्हणतात, “डोळे उघडले अन्…”

करीनाचा राग इतका अनावर झाला की तिने बॉबीचाही त्यावेळी अपमान केला. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान करीनाने कारण नसतानाही वाद वाढवला असल्याचा आरोप बिपाशाने केला. पण काही काळ गेल्यानंतर दोघींमधील वाद संपला असल्याच्या चर्चा होत्या. काही वर्षानंतर करीनाने सैफ अली खानच्या बर्थडे पार्टीला बिपाशाला आमंत्रित केलं होतं.

Story img Loader