बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खान आज ४२ वर्षांची झाली आहे. करीना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत झाला. ती रणधीर कपूर आणि बबिता यांची धाकटी मुलगी आहे. कपूर कुटुंबीय चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने करीनाही त्याच वातावरणात मोठी झाली. त्यामुळे तिनेही करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडलं. आज तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
सारा अली खानने सावत्र आई करीनाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; फॅमिली फोटो शेअर करत म्हणाली…
करीनाने २००० साली रेफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात करीनाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि तिला ‘फिल्म फेयर फॉर बेस्ट डेब्यू’चा पुरस्कार देण्यात आला होता. करीना कपूरच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. तिने २००१ मध्ये तुषार कपूरबरोबर ‘मुझे कुछ कहना है’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.
Photos : ‘…अन् थांबणारही नाही… ‘ अभिनेत्री आलिया भटने शेअर केले खास फोटो
करीनाच्या करिअरमध्ये असाही एक काळ आला जेव्हा एकापाठोपाठ ‘मुझसे दोस्ती करोगे!’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाशः द हंट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ आणि ‘एलओसी कारगिल’ हे तिचे सहा चित्रपट फ्लॉप झाले. पण तिने ‘कभी खुशी कभी गम’मध्ये केलेली ‘पू’ ही भूमिका आणि जब वी मेट, थ्री इडियट्स अशा चित्रपटातील तिच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत.
करीना तिच्या चित्रपटांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्य़ामुळेही चर्चेत राहिली. करीना कपूरने ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. दोघांचे धर्म वेगळे होते, तसेच करीना आणि सैफच्या वयामुळे त्यांच्या लग्नावरून बराच वाद झाला होता. केवळ लग्नच नाही तर सैफ आणि करीनाने मुलांची नावं तैमूर अली खान आणि जहांगीर ठेवली, यावरूनही बराच वाद झाला होता. याशिवाय करीना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे तिच्या काही वक्तव्यांवरूनही तिला ट्रोल केलं गेलं.