दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटात रॅप गायक यो यो हनी सिंगच्या ‘आता माझी सटकली’ या गाण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल यावर ठाम विश्वास असल्याचे मत या चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूरने व्यक्त केले आहे.
‘सिंघम’ चित्रपटात ‘आता माझी सटकली’ हा संवाद लोकप्रीय झाला होता त्यावरच आता हनी सिंगने रॅप गाणे तयार केले असून ते सिंघम रिटर्न्समध्ये चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यात अभिनेता अजय देवगण पोलीस अधिकाऱयाच्या ‘सिंघम’ अवतारात असून त्याच्यासोबत शेकडो लहान मुले पोलीसाच्या वेशभुषेत ठेका धरताना दिसणार आहेत.
या गाण्याबद्दल बोलत असताना करिना म्हणाली की, “मी हनी सिंगच्या गाण्यांची चाहती आहे. त्यामुळे मी या गाण्यासाठी भरपूर उत्साहीत आहे आणि पहिल्यांदाच माझी भूमिका असलेल्या चित्रपटाला हनी सिंगने गाणे दिले आहे. ज्याप्रकारे गाण्याचे उत्कृष्टरित्या चित्रिकरण करण्यात आले आहे त्यावरून हे गाणे बॉलीवूडमध्ये नक्की धुमाकूळ घालेल याचा विश्वास आहे.” असेही ती म्हणाली. 

Story img Loader