करिना कपूरचा सैफसोबतचा रोमान्स आणि लग्न हे सर्वांसाठी मोठी बातमी असते. पण, खरं तरं करिनाला प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडत नाही.
गेल्या वर्षी ४३ वर्षीय सैफ अली खानसोबत लग्न केलेल्या करीनाने आपली इमेज बनवण्यासाठी कधी प्रयत्नच केले नाही, असं ती म्हणते. करीना म्हणते, “लोक मला गर्विष्ठ का समजतात माहित नाही. मी अशी व्यक्ती नाही जी आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून मुलाखत देते. मी जे काही करते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी असे काही केले नाही. माझे काम जास्त बोलते, त्यामुळे मी प्रसिद्धीपासून लांबचं राहणे पसंत करते. ‘अशोका’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चमेली’, ‘ओमकारा’, ‘जब वी मेट’ आणि ‘तलाश’ सारख्या चित्रपटात काम करुन करीनाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवले आहे. करीना म्हणाली, अभिनेत्री होणं लहानपणापासून माझं स्वप्न होत आणि वडील रणधीर कपूर, आई बबीतानं नेहमीच माझ्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
करीनाचा ‘गोरी तेरे प्यार में’ हा आगामी चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शत होत आहे. ती या चित्रपटाबाबत खूप उत्साहित आहे. तसेच, यावेळी इमरानसोबत काम करण्याचा खूपच मजेदार असल्याचेही करिना म्हणाली. याआधी दोघांनी एक मै और एक तू चित्रपटात काम केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan i dont know why people feel that i am snooty