येत्या २९ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. काय स्वस्त आणि काय महाग होणार? यासोबतच कर आकारणीचे स्वरुप कसे असेल? अशा थेट खिशाला हात घालणाऱया बाबींवर सर्वसामान्यांपासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. पण याबाबत बॉलीवूड कलाकारही मागे पडलेले नाही. अभिनेत्री करिना कपूर खानला या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत त्या ती अर्थविषयक वृत्त वाहिनीवर सांगणार असल्याचे वृत्त आहे
बॉलीवूडलाइफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, करिना आगामी अर्थसंकल्पाबाबत आपले विचार मांडणार आहे. तसेच अर्थसंकल्पाकडून तिच्या काय अपेक्षा आहेत यावरही ती बोलणार आहे. करिनाच्या मते, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद करण्याची गरज आहे. तसेच, मुलांच्या शिक्षणबाबतही सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे.
२९ फेब्रुवारीला सादर होणा-या अर्थसंकल्पाबाबतच्या घडामोडींवर करिना विशेष लक्ष ठेवत असल्याचे कळते.

Story img Loader