बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या करीना कपूरने पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. पण अशात करीनाचा एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील गोंधळले आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करीना कपूरसोबत या व्हेकेशनला तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रीण अमृता अरोरा देखील आहे. या दोघींनीही सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यात सर्वजण व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. एकूणच करीना कपूर तिच्या कुटुंबासोबत खूप चांगला वेळ व्यतित करताना दिसत आहेत. पण अशात करीनाचा एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती सैफ आणि एका व्यक्तीसोबत दिसत आहे.

आणखी वाचा- जेव्हा रणवीर सिंगने तैमुरला म्हटलं होतं ‘म्हातारपणातला आधार’, म्हणाला “त्याच्या बापाची…”

करीना कपूरच्या या फोटोमुळे तिचे चाहतेही गोंधळले आहेत. या फोटोमध्ये ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी हा प्रश्न केला आहे. सोशल मीडियावर करीना पुन्हा एकदा गरोदार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

करीना कपूर आणि फ्रेंड्सनी या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो पाहता अनेकांना करीना खरंच गरोदर असल्याचा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत. कारण यातील जवळपास सर्वच फोटोमध्ये करीना कुठेतरी मागे उभी असलेली किंवा सैल कपडे घातलेली किंवा पोट लपवताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी करीना पुन्हा गरोदर असल्याचा अंदाज लावला आहे. दरम्यान करीनाच्या कामाबद्दल बोलायचं असेल तर ती लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.