बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून तिचा दुसरा मुलगा जेह म्हणजेच जहांगीरच्या नावामुळे चर्चेत आहे. नुकताच जेहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर जेह हा करीनासारखा दिसतो याचा खुलासा करीनाने केला आहे. एवढंच नाही तर तैमूर आणि जेह हे दोघे ही अभिनेते व्हायला नको अशी इच्छा करीनाची असल्याचे तिने सांगितले आहे.
करीनाने नुकतीच ‘एचटी ब्रंच’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत करीना तिच्या दोन्ही मुलांविषयी मोकळेपणाने बोलली आहे. ‘जेह फक्त ६ महिन्यांचा आहे आणि तो माझ्यासारखा दिसतो,’ असे करीना म्हणाली.
View this post on Instagram
‘करीना कशी आई होईल?’ असा प्रश्न विचारता ती म्हणाली, ‘माझे दोन्ही मुलं सज्जन बनले पाहिजे, लोकांनी माझ्या मुलांना सुशिक्षित आणि दयाळू म्हटले पाहिजे. जर असे झाले तर मला वाटेल की मी चांगल काम केलं आहे. त्या दोघांनी अभिनेता व्हावे अशी माझी इच्छा नाही. जर तैमूर मला म्हणाला की, ‘त्याला दुसरं काही करायची इच्छा आहे. मला एव्हरेस्ट चढायचा आहे किंवा दुसरं काही सांगितलं. तरी मी माझ्या मुलांना नेहमीच पाठिंबा देईन.’
आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत
करीनाने पुढे सैफ तिची थट्टा कशी करतो हे सांगितलं आहे. करीना जेव्हा फोटोग्राफर्सला पोज देते. तेव्हा सैफ तिची थट्टा करतो आणि म्हणतो, ‘आई फोटोग्राफर्सला पोज देते आणि मग मुलं तिचं बघून तिच्यासारख करतात.’