बॉलिवूड स्टार जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी आज (रविवारी) तान्हुल्याचे आगमन झालं आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीची आणि त्यांच्या बाळाची चर्चा सुरु आहे. यामध्येच या नव्या चिमुकल्याचं नेमकं नाव काय असेल ही उत्सुकतादेखील चाहत्यांना लागली आहे. त्यातच तैमुरच्या नावाप्रमाणेच या बाळाचं नावदेखील असंच काहीसं असेल का असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे या नव्या बाळाच्या नावासोबतच तैमुरच्या नावाचीदेखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेक जण तैमुर या नावाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाचा : शशांक केतकरच्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाचं नावही ठरलं

करीना आणि सैफ या जोडीला यापूर्वी तैमुर हा मुलगा असून त्याच्या नावावरुन सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता. त्याच्या नावावर अनेकांना आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर सैफने तैमुरचं नावदेखील बदलण्याचा विचार केला होता, असं सांगण्यात येतं. त्यामुळे तैमुरचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

तैमुर नावाचा अर्थ 

तैमुर या नावाचा खरा अर्थ लोह किंवा पोलाद असा होतो. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तैमुर लंग ज्यांना तिमुर (तिमुर या शब्दाचा अर्थ लोह) या नावानेही ओळखले जायचे. १४ व्या शतकातले एक शासक होते. ज्यांनी तैमूरी राजवंशाची स्थापना केली होती. त्यांचे राज्य पश्चिम आशियापासून होत, मध्य आशियापासून ते भारतापर्यंत पसरलेले होते. त्यांचे नाव जगातल्या महान योध्यांच्या यादीत घेतले जायचे. ते बरसल येथील तुर्क कुटुंबात जन्माला आले होते. तैमुर लंग यांचा जन्म १३३६ मध्ये झालेला. तैमूर इस्लामचा कट्टर अनुयायी होता. शिवाय ते फार महत्त्वकांक्षीही होते.