बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. करीनाने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करीनाने दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचे आभार मानले आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. करीनाने शनिवारी रात्री हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिर्याणी आणि बरेच पदार्थ दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ही बिर्याणी प्रभासने पाठवल्याचे करीनाने सांगितले आहे. करीनाला ही बिर्याणी प्रचंड आवडली आहे. हा फोटो शेअर करत, “जेव्हा बाहुबली तुम्हाला बिर्याणी पाठवतो, तर ती सगळ्यात चांगलीच असेल ना. या अप्रतिम आणि चविष्ट जेवणासाठी धन्यवाद प्रभास,” अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. यासोबत करीनाने ‘आदिपुरुष’ हे हॅशटॅग देखील वापरले आहे.
आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

प्रभास आणि करीनाचा पती अभिनेता सैफ अली खान ‘रामायण’वर आधारीत ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम करणार आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास प्रभु राम यांची भूमिका साकारत आहे. सीतेची भूमिका क्रिती सेनन साकारत आहे. सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत करत आहेत.