बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. बऱ्याचवेळा करीनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळी करीनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केले आहे.
करीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत करीनाने क्रिम कलरचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. करीना बिल्डिंगच्या बाहेर येत असल्याचे दिसते. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे तिच्या हातात असलेल्या कॉफीचा मगने वेधले आहे. करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे.
करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘करीना आंटी तिची कॉफी घरी का पित नाही?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही आज काल कप हातात घेऊन का फिरते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कॉफी जर गाडीत पिण्याची वेळ येत असेल तर, एवढं मोठ घर काय कामाचं आहे’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.
करीना लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूडच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या व्यतिरिक्त करीना तख्त या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहेत.