बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीना एक फॅशनिस्टा आहे आणि तिच्या फॅशन आणि स्टाईलचे लाखो चाहते आहेत. आता करीना तिच्या एका लूकमुळे सध्या चर्चेत आहे.
करीनाचा हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत करीनाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची फिट डेनिम परिधान केली आहे. तिच्या एका हातात मघ आणि एका हातात मोबाईल आहे. परंतु करीनाच्या टी-शर्ट सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या शर्टची किंमत ही ५० हजार आहे. परंतु ही किंमत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली
![kareena kapoor khan, kareena got trolled,](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2021/09/kareena-kapoor-inside-photo.jpeg)
करीनाला तिच्या या टी-शर्टवरून ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘अरे थोडे दिवस थांबा हा टी-शर्ट २०० रुपयात लिंकिंग रोडला मिळेल’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘याला मी पुढच्या वर्षी होळीत घालेन’. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मित्रांनो सरोजनी बाजारात ३५० रुपयात हा टी-शर्ट मिळत आहे’. आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘आमच्या इथे ३०० रुपयाला मिळतो हा टी-शर्ट, करीनाची फसवणूक झाली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एवढ्यात ५०० टी-शर्ट विकत घेईन मी’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केले आहे.