बॉलिवूडमधील बहुचर्चित अभिनेत्रींमध्ये करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) नंबर टॉपला आहे. करीनाबाबत अनेक चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतात. करीना काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली. यादरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत करीनाला नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं.

आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर 

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. करीनाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “तो फोटो एडिट करण्यात आला होता. माझ पोट त्यावेळी वेगळं दिसत होतं. ते पाहून मी विचार केला देवा हे नेमकं काय आहे? बहुदा हे वाईन आणि पास्तामुळे झालं असावं. मी जवळपास ४० दिवसांच्या सुट्टीवर होते. त्यादरम्यान मी किती पिझ्झा खाल्ले हे देखील मला माहित नव्हतं.”

एखाद्या स्त्रीचं वजन वाढलं की लोकांच्या मनात पहिलं येतं की, ती गरोदर तर नाही ना… यावर करीनाने म्हटलं की, “ती गरोदर आहे का? या प्रश्नाला काय अर्थ आहे. करीना खरंच आणखी एका मुलाची आई होणार आहे का? हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला असं वाटतं मी खरंच मशीन आहे का? पुन्हा आई होण्याचा निर्णय ही माझी पसंती आहे.”

आणखी वाचा – Video : “बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घ्या कारण…” लेकीसह विशाळगडावर गेलेल्या अजय पुरकरांचं शिवप्रेमींना आवाहन

तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु असताना करीनाने इन्स्टाग्रामद्वारे खास पोस्ट शेअर केली होती. मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही असं देखील यावेळी करीनाने सांगितलं. पण प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे असं तिने स्पष्टपणे आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं. करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना यामुळे पुर्णविराम मिळाला आहे.

Story img Loader