करीना कपूर आणि नीतू कपूर या दोघीही बॉलीवूडच्या कपूर घराण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघीही आपापल्या पिढ्यांच्या स्टार आणि आघाडीच्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु, त्यांनी कधीही एकमेकींबरोबर स्क्रीन शेअर केलेली नाही. पण अलीकडेच या काकू-पुतणीच्या जोडनी एका नवीन प्रोजेक्टसाठी स्क्रीन शेअर केली आहे. यासंदर्भात घोषणा करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काकू नीतूबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आणि लिहिलं, “जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर शूट करता…”.

करीनाने शेअर केलेली स्टोरी…

नीतू यांनी ही स्टोरी “Loveee her” या कॅप्शनसह रिपोस्ट केली.

नीतू कपूर यांनी रिपोस्ट केलेली स्टोरी…

तसेच “हा शॉट रिअल शॉटपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे,” असं म्हणत त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला. याशिवाय जेवण करतानाचा एक फोटो शेअर करत मजेदार कॅप्शन दिलंय.

नीतू कपूर यांनी शेअर केला जेवतानाचा फोटो…

करीना कपूर आणि नीतू कपूर या सख्ख्या काकू-पुतणी आहे. नीतू कपूर यांचे दिवंगत पती अभिनेते ऋषी कपूर आणि करीनाचे वडील रणधीर कपूर हे सख्खे भाऊ आहेत. तसेच ते दिवंगत चित्रपट निर्माते राज कपूर यांची मुलं आहेत. १९८० मध्ये ऋषी कपूरशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं होतं. पण नीतू कपूर यांनी नुकतंच धर्मा प्रॉडक्शनच्या ‘जुग जुग जीयो’मधून चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं. याशिवाय त्या कलर्सच्या डान्स दिवाने ज्युनियर्स शोचे जज म्हणून दिसल्या होत्या.