करिना कपूर खान बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, सध्याचे तिचे काही चित्रपट तिकीट बारीवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. पण, आपण असे चित्रपट नाकारले आहेत जे प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर गाजले आणि याबाबत आपल्याला अजिबात दुःख नसल्याचे करिनाचे म्हणणे आहे.
करिना म्हणाली की, माझ्यासारखी दुसरी कोणती अभिनेत्री नसेल जिची काम केलेल्या चित्रपटांपेक्षा नाकारलेल्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. मी असे कित्येक चित्रपट नाकारून दुस-यांच्या झोळीत टाकले आहेत. मला वाटत मी वेडी आहे. मला नाही आवडला तर मी त्या चित्रपटात काम करत नाही. मी घरी राहून पार्टी करते किंवा प्रवासास जाते. करिनाने ‘राम लीला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘फॅशन’, ‘पेज ३’, ‘कल हो ना हो’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारले आहेत.
नाकारलेल्या चित्रपटांतील काही चित्रपट सुपरहिट झाल्याचे मला दुःख नाही. मला जीवनात मागे वळून पाहायला नाही आवडत, असेही करिना म्हणाली.

Story img Loader