बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी अभिनेत्री प्रियांकाचे वडिल डॉ. अशोक चोप्रा यांच्या शोकसभेसाठी हजर होते. मुंबई उपनगरातील विलेपार्ले येथील  पंचतारांकीत हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये मंगळवारी ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. अशोक चोप्रा यांचा वयाच्या ६२ व्या वर्षी सोमवारी दुपारी अंधेरीच्या कोकीळाबेन धिरूभाई अंबानी रूग्णालयात कॅन्सरमुळे मृत्यू झाला.
या शोकसभेसाठी अभिनेत्री विद्या बालन, करीना कपूर, राणी मुखर्जी, मधुर भांडारकर, करिश्मा कपूर, ऋषी कपूर, नीतू सिंग, रणवीर कपूर, शिल्पा शेट्टी, दिपीका पदुकोन, झोया अख्तर, राकेश रोशन, रोहन सिप्पी, इम्रान खान, अरवबाज खान पत्नी मलाईका व इतर सेलिब्रिटी हजर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor other bollywood celebs attend condolence meet of priyanka chopras father