बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर आणि पती सैफ अली खान त्यांच्या चित्रपटांपेक्षा कौटुंबिक जीवनामुळे नेहतीच चर्चेत असतात. करीना आणि सैफ दोघांचेही लाखो चाहते आहेत. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याच वेळा करीनाला सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. फक्त करीना नाही तर सैफ आणि त्यांची दोन्ही मुलं तैमूर आणि जहांगीर यांना देखील सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. आता पहिल्यांदा करीनाने तिच्या मुलांना त्यांच्या नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
करीनाचे म्हणणे आहे की तिला आणि सैफला तैमूर आणि जहांगीर ही दोन्ही नावे आवडली. त्यामुळेच त्यांनी मुलांची नावं तैमूर आणि जहांगीर ठेवली आहेत. तर जेव्हा तिच्या मुलांना त्यांच्या नावावरून ट्रोल केले जाते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. करीनाने नुकतीच ‘द गार्डियन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘माझ्या मुलांची नाव ही फक्त आम्हाला आवडलेली नावं आहेत. त्याहून जास्त काही नाही. ही नाव खूप सुंदर आहेत आणि दोन्ही मुलं देखील सुंदर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी मुलांना कसं ट्रोल करू शकतं? हे वाईट वाटण्यासारखं आहे. मला वाईट वाटतं पण मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझे आयुष्य ट्रोल्स नुसार जगत नाही,’ असे करीना म्हणाली.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण
करीना लवकरच ‘लालसिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे, तर आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंह चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त करीना हंसल मेहता आणि एकता कपूरच्या एका नवीन चित्रपटात दिसणार आहे.