करीना कपूर तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. करीनाने दुसऱ्या मुलाचं नावं जहांगीर ठेवल्यानंतर सोशल मीडियावरून करीना आणि सैफ अली खानला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. करीनाने तिच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात मुलाच्या नावाचा खुलास केलाय. या पुस्तकामुळे करीना चांगलीच चर्चेत आलीय. या पुस्तकात तिने दोनही गरोदरपणावेळी आलेले अनुभव मांडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुस्तकात पहिल्या गरोदरपणाविषयी सांगताना करीनाने तिला तैमूरच्या जन्मानंतर कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे हे देखील सांगितलं. तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना मोठ्या अडचणी आल्याचं ती या पुस्तकात म्हणाली आहे. या पुस्तकात तिने लिहिलंय, ” तैमूरचा जन्म अचानक सेझिरेयन ऑपरेशनने झाला होता. १४ दिवस माझ्या स्तनांमध्ये दूध तयार झालं नव्हत. माझी आई आणि नर्स सतत काहीना काही प्रयत्न करत होत्या. त्या माझे स्तन वारंवार दाबून पाहायच्या आणि दूध येत नसल्याने चिंताग्रस्त व्हायच्या.” असं करीना तिच्या पुस्तकात म्हणालीय.

हे देखील वाचा: लोकप्रिय मालिकेच्या एका मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांनी घेतलं ‘इतकं’ मानधन, ऐकून बसेल धक्का

पहा फोटो: Birthday Special: टीव्ही रिपोर्टर ते अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

तर या पुस्तकात तिने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मात्र स्तपान करण्यात कोणत्याच अडचणी आल्या नसल्याचं म्हंटलं आहे. “दसऱ्या बाळाच्या जन्मानंतर मला चांगलं दूध येत होत. त्यामुळे काही अडचणी आल्या नाही. दुसऱ्या बाळाला स्तनपान करण्याचं मला खरं समाधान मिळालं हे मी कबुल करेन.” अंसं करीनाने पुस्तकात म्हंटलंय.

करीनाचा पहिला मुलगा तैमूर सध्या ४ वर्षांचा आहे. तर २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच करीना दुसऱ्यांचा आई झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor reveals struggled for breastfeeding after taimur birth in her book pregnancy bible kpw