स्टार किड्सची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. त्यात बॉलिवूडची बेबो करीना कपूरचे (Kareena Kapoor Khan) लाडके तैमूर (Taimur) आणि जहांगीर (Jeh) तर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, या वेळी फक्त चर्चा ही तैमूरची नाही तर जेहच्या गाडीची आहे.
सोशल मीडियावर सध्या तैमूर आणि जहांगीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत तैमूरने नारंगी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर करिनाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर जेह त्याची टॉय कार चालवत असल्याचे दिसत आहे. पण जेह चालवत असलेल्या या गाडीची किंमत २७ हजार पेक्षा जास्त आहे. BMW X5 M असे या गाडीचे नाव आहे.
आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!
आणखी वाचा : “कृपया मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर…”, ‘शेर शिवराज’ प्रदर्शित होताच चिन्मय मांडलेकरने केली विनंती
आणखी वाचा : सलमानच्या ‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदेचा पत्ता कट, मेहूणा आयुष शर्माची एण्ट्री
या व्हिडीओच्या सुरुवातीला तैमूर फोटोग्राफर्सला “शूट करणं बंद कर दादा” असं बोलताना दिसतं आहे. त्यानंतर तैमूरला संस्कार नाहीत असं म्हणतं त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
आणखी वाचा : चित्रपटात काम करण्यासाठी घरातून पळून गेली होती ‘जयेशभाई जोरदार’ मधील अभिनेत्री आणि…
दरम्यान, करीना लवकर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोषच्या दिग्दर्शित चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून समोर गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘The Devotion of Suspect X’ वर आधारीत आहे. या व्यतिरिक्त करीना आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.