स्टार किड्सची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. त्यात बॉलिवूडची बेबो करीना कपूरचे (Kareena Kapoor Khan) लाडके तैमूर (Taimur) आणि जहांगीर (Jeh) तर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून तैमूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर सध्या तैमूर आणि जहांगीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत तैमूरने नारंगी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर करिनाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर जेह त्याची टॉय कार चालवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तैमूर फोटोग्राफर्सला “शूट करणं बंद कर दादा” असं बोलताना दिसतं आहे. तैमूरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्यात संस्कार नाही असं म्हटलं आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

आणखी वाचा : “कपाळावर टिकली का नाही?”, करीनाने हिंदूच्या सणांचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप

दरम्यान, करीना लवकर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोषच्या दिग्दर्शित चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून समोर गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘The Devotion of Suspect X’ वर आधारीत आहे. या व्यतिरिक्त करीना आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor s son taimur ali khan asks paparazzi to turn off cameras says bandh kariye dada dcp