बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. करीना मोकळेपणाने तिचं मत मांडते. त्यानंतर तिला कितीही कोणी काही म्हणालं तरी ती स्वत:च मत बदलत नाही. बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या शोमध्ये आपल्याला याचा अनुभव आला आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये सोनमला ट्रोल केलं तर रॅपिड फायर राऊंडमध्ये दिलेल्या उत्तराने करीनाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते. करणने तिला विचारले की, ‘जर ती पती सैफ अली खान आणि एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरसोबत एका लिफ्टमध्ये अडकली तर ती काय करेल?’ यावर उत्तर देत करीना म्हणाली, ‘मी त्यांना विचारेन की त्यांनी मला ‘रंगून’मध्ये का घेतले नाही? आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण केले असते.’
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘हे सगळ अकल्पनीय आहे’,डिंपल चीमा यांच्यासोबत भेटीनंतर कियारा झाली भावूक
यानंतर करणने तिला असाच एक प्रश्न विचारला, जर दीपिका पादूकोन आणि कतरिना कैफसोबत ती लिफ्टमध्ये असेल तर ती काय करेल असा प्रश्न करणने विचारला. करीना म्हणाली मी स्वत:ला संपवेन.
दरम्यान, करीना सैफचा ५१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदिवला गेले होते. तिथले करीनाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. करीना गेल्या काही दिवसांपासून तिचा धाकटा मुलगा जहांगीरच्या नावामुळे चर्चेत आली होती.