करिना कपूर नेहमीच तिच्या स्टाइल आणि लूक्समुळे बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आली आहे. पण यावेळी करिना चर्चेत असल्याचं कारण वेगळं आहे. नुकतीच करिना प्रसारमाध्यमांना तिचे फोटो काढण्यापासून रोखत होती. केसांत तेल लावलं असल्यामुळे माझे फोटो काढू नका असं ती वारंवार प्रसारमाध्यमांना सांगत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच करिनाला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरून बाहेर पडताना पाहण्यात आले. मनीषच्या घरातून निघताना करिनाला पाहताच प्रसारमाध्यमांनी तिला एक फोटो देण्याची विनंती केली. तेव्हा करिना म्हणाली की, ‘मी पोझ देऊ शकत नाही कारण केसांमध्ये तेल लावलं आहे.’

करिनाच्या फिटनेसवरूनच ती तिच्या स्टाइलची आणि लूकची किती काळजी घेते हे साऱ्यांनाच माहित आहे. तैमुरच्या जन्मानंतर फार कमी काळात तिने व्यायाम आणि योग्य आहारातून वाढलेले वजन कमी केले. नुकताच तिचा वीरे दी वेडिंग सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर करिना सैफ आणि तैमुरसह लंडनला सुट्यांचा आनंद लुटण्यास गेली. तैमुरला योग्य वेळ देता यावा म्हणून आता करिनाने वर्षाला एक याप्रमाणेच सिनेमे करणार असल्याचे तिने ठरवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor say no to photographer for click picture video viral