कपूरांची बेबो आणि सैफ अली खानची बेगम करिना कपूर भलतीच भडकली आहे, म्हणते सैफनं नव्हता मागितला ‘पद्मश्री’ पुरस्कार. त्याच झालं असं, सैफला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात अडकल्याने, केंद्र सरकार त्याचा हा पुरस्कार काढून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या पतीरायाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी बेगम करिना लगेच पतीची पाठराखण करण्यासाठी धावून येत म्हणाली, हा पुरस्कार माझ्या पतीला प्रदान करण्यात आला होता, त्यानं तो मागितला नव्हता. वास्तविक हा राष्ट्रीय सन्मान असून, हा सन्मान प्रदान करण्यापूर्वी सरकारनं संबंधितांची सर्वोतोपरी चौकशी केली असणार. जर सैफने हा पुरस्कार परत केला, तर त्याला या सर्व प्रकरणातून सुटकेचा निःश्वास मिळेल. इथे हे सांगणे आवश्यक आहे की, २०१२ साली सैफ अली खानने दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये एका दक्षिण अफ्रिकी व्यापाऱ्याला आणि त्याच्या सासऱ्याला मारहाण केली होती.

Story img Loader