दुसऱ्यांदा आई झाल्यानंतरही करीना कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. रोज वेगवेगळ्या पोस्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. इतकच काय तरी करीनाने लगेचच काम करण्यासही सुरुवात केली आहे. करीनाने नुकताच एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

करीना कपूरने तिचा ‘कि अ‍ॅण्ड का’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो 5 वर्ष जुना आहे. करिनाने या फोटसोबत जोडल्या गेलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. या सिनेमानंतर काही दिवसातंच पहिल्यांदा गर्भधारणा झाल्याचं तिने म्हटंलं आहे.

करिना कपूरने ‘कि अ‍ॅण्ड का’ च्या शूटिंगच्या वेळेचा अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक बाल्की सोबतच एक फोटो शेअर केला आहे. यात ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. ” एक सिनेमा जो मी खूप एन्ज़ॉय केला. एक सिनेमा जो थोडा बोल्ड होता. एक सिनेमा ज्यानंतर तैमूरला कंसीव केलं, एक सिनेमा ज्याचा सिक्वल बनणं गरजेचं आहे कारण मी पुन्हा अर्जुन आणि बाल्कीसोबत काम करू इच्छिते. अर्जुन काळजी करू नको, मी परत बोलत राहिन चप्पल लोओ.” असं मजेशीर कॅप्शन करीनाने या फोटोला दिलं आहे.

करीनाच्या या फोटोला अनेक सेलिब्रिटीनी आणि चहत्यांनी पसंती दिली आहे. तर अर्जुन कपूर ने ” चप्पलचं ठिर आहे.” अशी कमेंट दिली आहे.

2016 मध्ये आलेला हा सिनेमा रोमॅण्टिक कॉमेडी होता. ज्यात करीनाने एका वर्किंग वुमनची भूमिका साकारली आहे. तर अर्जुन कपूर या सिनेमात एखाद्या गृहिणीप्रमाणे घर सांभाळताना दिसला. या सिनेमामध्ये अर्जुन कपूर आणि करीना यांचा एक बोल्ड सिन आहे. या सिनमुळे बऱ्याच चर्चा देखील रंगल्या होत्या. बहिण-भाऊ असताना करीनाने असा सिन कसा दिला अशा चर्चा यावेळी रंगल्या होत्या.

Story img Loader