घरोघरी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरीदेखील गणपती बाप्पाची पूजा पार पडली. नुकतचं धर्माबद्दल आपलं वक्तव्य मांडल्यामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान बाप्पासमोर मात्र नतमस्तक झालेला दिसून आला.
करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटो शेअर करत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने शेअर केलेल्या फोटोत ती सैफ आणि तैमूर सोबत दिसतेय. यात सैफ आणि तैमूर गणपती बाप्पापुढे हात जोडून उभे असल्याचं दिसून येतंय. सोबतच करीनाने तैमूरने तयार केलेल्या रंगीत मातीच्या बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन दिलंय. “माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत आणि टीम टीमच्या क्यूट रंगीत मातीच्या गणपतींसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे.” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा: ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या लतिका आणि अभिमन्यूचं गणरायाकडे साकडं
करीना कपूरने शेअर केलेल्या या फोटोंवर सैफिनाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये खास करून हात जोडलेल्या तैमूरने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या फोटोंवरुनही धार्मिक कमेंट करत करीना आणि सैफवर निशाणा साधला आहे.