बॉलिवूड म्हटलं की कलाकार, चाहते आणि पापाराझी हे समीकरणचं बनलं आहे. सध्या सिनेसृष्टीत स्टार किड्सची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांची दोन्हीही मुलं आतापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. सैफ आणि करीना यांना दोन मुलं असून तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नाव आहेत. नुकतंच करीनाच्या लाडक्या जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जेह हा पापाराझींकडे कुतूहलाने पाहताना दिसत आहे.

सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेह हा त्याच्या वांद्र्यातील घराजवळ जाताना दिसत आहे. त्यावेळी काही पापाराझी त्याचा फोटो काढताना दिसत आहे. यावेळी जेह हा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत त्यांच्याकडे धावत जाताना दिसत आहे. यावेळी त्याला सांभाळणारी नॅनी (आया) ही त्याचा हात पकडून त्याला आत नेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जेहने त्याचा हात सोडवत पापाराझींना पोज दिली. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आणखी वाचा : लोकसंख्या वाढीत सैफ अली खानचं खूप योगदान! तिसऱ्या प्रेग्नन्सीबद्दल करीना कपूरचं मोठं वक्तव्य

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होताना दिसत आहे. या व्हिडीओ त्याने पांढर्‍या रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी शॉर्ट्स परिधान केले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. जेह मीडिया फ्रेंडली आहे. त्याला इंटरव्ह्यू द्याची इच्छा आहे. तर काहींनी जेहला क्यूट बेबी म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याला कॅमेऱ्याबाबत कुतूहल वाटत असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा : तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर करीना कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली “सैफने आधीच…”

दरम्यान, करीना लवकर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोषच्या दिग्दर्शित चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून समोर गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘The Devotion of Suspect X’ वर आधारित आहे.

Story img Loader