बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. करीना काही दिवसांपूर्वी पती सैफ अली खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदिवला गेली होती. तर गेल्या काही दिवसांपासून करीना तिचा धाकटा मुलगा जेह म्हणजेच जहांगीरमुळे चर्चेत आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की ममता बॅनर्जी यांनी जेहला कडेवर घेतलं होत.
सैफचा ५१ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर करीना आणि सैफ मुंबईत परतले आहेत. संपूर्ण कुटुंबाचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जहांगीर त्याच्या आयासोबत दिसत आहे. ही तिच आया आहे जी तैमूरला आधी सांभाळायची. आता या व्हिडीओला पाहून नेटकरी त्या ममता बॅनर्जी असल्याचे म्हणत आहेत.
View this post on Instagram
आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहून जहांगीरची आया या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत असे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांच्या हातात जेह आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ममता बॅनर्जी आया का बनल्या आहेत?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जेहला पकडलेली ती महिला ममता बॅनर्जी यांच्या सारखी दिसत आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ममता बॅनर्जी जेहला कडेवर घेऊन काय करत आहेत,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी जेहच्या आयाची तुलना ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी केली आहे.
आणखी वाचा : टायगर श्रॉफने मुंबईतील सगळ्यात महागड्या ठिकाणी घेतले घर!
करीनाचा धाकटा मुलगा जेहचा जन्म फेब्रुवारीत झाला आहे. मात्र, अजून करीनाने जेहचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. सोशल मीडियावर फोटो शेअर करत असताना करीना त्याच्या चेहऱ्यावर इमोजी वापरत लपवताना दिसते. मात्र, मालदिवमधल्या काही फोटोंमध्ये जेहचा चेहरा दिसला आहे. तर करीनाने करीना कपूर खान प्रेग्नेंसि बायबल या पुस्तकात तैमूर हा सैफसारख तर जेह हा तिच्या सारखा दिसतो असे सांगितले आहे.