चित्रपटाची जाहिरात करण्याकरिता नवनवीन योजना बॉलीवूड आणत आले आहे. रिअॅलिटी शो, टि.व्ही मालिका, पुरस्कार सोहळे यांद्वारे चित्रपटाची जाहिरात केली जात आहे. मात्र, सत्याग्रह चित्रपपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी अभिनेत्रींना मेकअपविना प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरवले आहे. बॉलीवूड अभिनेत्री मेकअपविना कुठेही जात नाहीत. पण, करिना आता मेकअपविना सत्याग्रह चित्रपटाची जाहिरात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट राजनैतिक नाट्यावर आधारित असून अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. सत्याग्रह ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader