करीना आणि इमरान हाश्मीची जोडी पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणार आहे. हा एक रोमॅन्टिक चित्रपट असून, याचे शुटिंग वर्षाखेरीस सुरू होणार आहे. इमरान आणि करीनाच्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरची बालाजी फिल्म्स आणि करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन करत आहेत. या  चित्रपटासाठी इमरान आणि करीनाला एकत्र आणल्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. हा एक रोमॅन्टिक चित्रपट असून, आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. चित्रपटाचे शुटिंग सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मुंबई आणि दिल्लीत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रपटाचे निर्माता अन्य कलाकारांची निवड करण्यात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बत्तमीज दिल’ असल्याची चर्चा असली, तरी सूत्रांकडून याचे खंडण करण्यात आले आहे.   अक्षय रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.

Story img Loader