यापुढे चित्रपटाच्या ऑफर्स निव्वळ मैत्रीसाठी न स्वीकारता चांगली कथा असल्यास चित्रपट स्वीकारणार असल्याचे अभिनेत्री करिना कपूर-खानचे म्हणणे आहे. माझ्यासाठी २०१४ हे आनंदाचे आणि खूप काही करण्याचे वर्ष आहे. मला पतीबरोबर वेळ घालवायचा आहे. त्याचप्रमाणे निव्वळ मैत्रीसाठी चित्रपट स्वीकारणार नसल्याचे करिना म्हणाली. आपण चांगल्या कथेची वाट पाहात असून, पसंत न पडणाऱ्या चित्रपटांना नकार देण्यास शिकत असल्याचे तिने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. ‘सिंघम २’ या चित्रपटात करिना दिसणार असून, याविषयी बोलताना ती म्हणाली, या चित्रपटात मी एका मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. या आधीदेखील मी रोहित शेट्टीबरोबर काम केले आहे. आम्ही एकत्रित काम करण्याने बॉक्स ऑफिसवर नेहमीच कमाल केली आहे.
निव्वळ मैत्रीसाठी चित्रपट स्वीकारणार नाही – करिना कपूर-खान
यापुढे चित्रपटाच्या ऑफर्स निव्वळ मैत्रीसाठी न स्वीकारता चांगली कथा असल्यास चित्रपट स्वीकारणार असल्याचे अभिनेत्री करिना कपूर-खानचे म्हणणे आहे. माझ्यासाठी २०१४ हे आनंदाचे आणि खूप काही...
First published on: 22-01-2014 at 02:43 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor to turn down films if offered purely due to friendship