यापुढे चित्रपटाच्या ऑफर्स निव्वळ मैत्रीसाठी न स्वीकारता चांगली कथा असल्यास चित्रपट स्वीकारणार असल्याचे अभिनेत्री करिना कपूर-खानचे म्हणणे आहे. माझ्यासाठी २०१४ हे आनंदाचे आणि खूप काही करण्याचे वर्ष आहे. मला पतीबरोबर वेळ घालवायचा आहे. त्याचप्रमाणे निव्वळ मैत्रीसाठी चित्रपट स्वीकारणार नसल्याचे करिना म्हणाली. आपण चांगल्या कथेची वाट पाहात असून, पसंत न पडणाऱ्या चित्रपटांना नकार देण्यास शिकत असल्याचे तिने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. ‘सिंघम २’ या चित्रपटात करिना दिसणार असून, याविषयी बोलताना ती म्हणाली, या चित्रपटात मी एका मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. या आधीदेखील मी रोहित शेट्टीबरोबर काम केले आहे. आम्ही एकत्रित काम करण्याने बॉक्स ऑफिसवर नेहमीच कमाल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा