बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच फरहान अख्तरसोबत काम करताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक बिजॉय नांबियारच्या पुढील चित्रपटात करिना कपूर अमिताभ आणि फरहान यांच्यासोबत दिसू शकते.
बिजॉय यांनी सदर चित्रपटासाठी विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकतेच करिना आपल्याला चित्रपटाची कथा आवडल्याचे सांगितले. पण सिंघम २च्या चित्रपटात काम करण्याबाबतचा निर्णय घेईल असेही ती म्हणाली. यावर बिजॉय म्हणाला की, मी सध्या याबाबत काहीच बोलू शकत नाही. पण या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा करणार आहेत.

Story img Loader