अभिनेत्री करिना कपूरने आजपर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यात भर म्हणून आता करिना महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या सिंघम-२ मध्ये करिना मध्यमवर्गीन महाराष्ट्रीयन घरातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी नुसती महाराष्ट्रीयन मुलीची वेशभूषा करिनाला देण्यात येणार आहे असे नाही. वेशभूषेसोबत करिना या चित्रपटात टीपीकल महाराष्ट्रीय मुलीसारखे संवादही करताना दिसेल.
सुत्रांच्या माहितीनुसार, सिंघमच्या यशानंतर दिग्दर्शक रोहीत शेट्टीने अभिनेता अजय देवगणसोबत सिंघम-२ लवकरच करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठीची कथाही अंतिम टप्प्यात आली होती. परंतु, अभिनेत्रीसाठी करिनाकडून होकार आला नव्हता. करिनाचा होकार आल्यानंतर रोहीत शेट्टीने अभिनेत्रीच्या भूमिकेत काही बदल केले. त्यानुसार करिना या चित्रपटात महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्यासाठी करिनाने मराठी बोलण्याचा सरावही सुरू केला आहे. करिना सध्या आपल्या मराठी मित्र-मैत्रणींसोबत मराठी बोलतायावे यासाठी चर्चाही करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
येत्या मार्च महिन्यात सिंघम-२ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा