करिना तिच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती ‘गोरी तेरे प्यार मे’ या चित्रपटात सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत आहे. सध्या ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईमध्ये सुरु आहे. चित्रपटात करिना ग्लॅमरस रुपात नसून साध्या वेशात दिसेल.
‘चमेली’मध्ये वेश्या, ‘३ इडियट्स’मध्ये वैद्यकिय क्षेत्रातील विद्यार्थिनी, ‘रा.वन’मध्ये गृहिणी अशा विविध भूमिका करिनाने साकारल्या आहेत. मात्र, पहिल्यांदा ती सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत आहे. करिनासोबत चित्रपटात इमरान खान आणि श्रद्धा कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करत आहे.
‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटात करिना करणार सामाजिक कार्यकर्तीची भूमिका
करिना तिच्या आगामी 'सत्याग्रह' चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती 'गोरी तेरे प्यार मे' या चित्रपटात सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत आहे.

First published on: 19-07-2013 at 12:08 IST
TOPICSइम्रान खानImran KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसत्याग्रहहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoorgori tere pyar meinsatyagrahasocial activistimran khanentertainment newshindi cinema hindi movie hindi filmbollywood