करिना तिच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती ‘गोरी तेरे प्यार मे’ या चित्रपटात सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत आहे. सध्या ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईमध्ये सुरु आहे. चित्रपटात करिना ग्लॅमरस रुपात नसून साध्या वेशात दिसेल.
‘चमेली’मध्ये वेश्या, ‘३ इडियट्स’मध्ये वैद्यकिय क्षेत्रातील विद्यार्थिनी, ‘रा.वन’मध्ये गृहिणी अशा विविध भूमिका करिनाने साकारल्या आहेत. मात्र, पहिल्यांदा ती सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत आहे. करिनासोबत चित्रपटात इमरान खान आणि श्रद्धा कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा