बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. करीनाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, यावेळी करीनाने नाही तर तिच्या एका फॅन क्लबने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करीनाच्या फॅन क्लबने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत करीनाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. त्यासोबतच तिने मास्क लावला आहे. करीना स्वयंपाक घरात असल्याचे दिसत आहे. हा फोटो करीनाच्या नवीन घराच्या गृहप्रवेशचा असल्याचे दिसत आहे. हा फोटो करीनाच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकातील आहे. यावेळी करीना ८ महिन्याची गर्भवती होती असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…

काही दिवसांपूर्वी करीना तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावामुळे चर्चेत आली होती. करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे टोपण नाव जेह आहे. तर त्याचे खरे नाव हे जहांगीर आहे. त्या दोघांनी आता पर्यंत त्यांच्या मुलाचे नाव सांगितले नव्हते. मात्र, आता करीनाचे पुस्तक प्रकाशित झाल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ही बोल्ड अभिनेत्री चक्क विकतेय मासे?

दरम्या, करीना लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट टॉम हॅक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे. आमिर या चित्रपटात एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

Story img Loader